महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मतदारांनो ! १२ पद्धतीची ओळखपत्रे ठेवा मतदानासाठी सज्ज ! गुरुवार, १४ मार्च, २०१९

चंद्रपूर : भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार बजाविण्यासाठी प्रत्येक नागरिकाला भारतीय निवडणूक आयोगातर्फे निवडणूक ओळखपत्र दिले जाते. निवडणुकीबरोबरच नित्यनेमाच्या अनेक कामांसाठी हे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. पुढील महिन्याच्या 11 तारखेला होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी  निवडणूक ओळखपत्राबरोबरच 12 प्रकारचे ओळखपत्र मतदारांना आपली ओळख म्‍हणून वापरता येणार आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदान करतांना या 12 पैकी कुठलेही एक ओळखपत्र मतदान केंद्रावर मतदारांनी सोबत आणावेअसे आवाहन निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी केले आहे.  


जिल्‍हयातील 
2125 मतदान केंद्रावर पुढील महिन्याच्या 11 तारखेला सकाळी 7 ते सायं. 5 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील 9,88,904 पुरुष तसेच 9,12,526 महिला असे एकूण 18,91,444 मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी प्राप्त होणार आहे. मतदारांसाठी ओळख म्‍हणून निवडणूक आयोगाकडून 12 प्रकारचे ओळखपत्र घोषीत करण्‍यात आले आहे. 18 वर्षावरील सुज्ञ नागरिकांना मतदान करण्याची संधी प्राप्त व्हावी याकरिता चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी मतदार नोंदणी अभियान राबविले आहे तसेच निवडणूक आयोगाचे ओळ्खपत्रही नागरिकांना प्राप्त झाले आहे. ज्या नागरिकांनी मतदार नोंदणी केलेली आहेअश्या समस्त नागरिकांना मतदान करता येणार आहे. परंतु ज्या नागरिकांना अजूनही निवडणूक आयोगाचे मतदान ओळखपत्र प्राप्त झाले नसेल त्यांनाही दिलेल्या 12 पैकी सुस्पष्ट छायाचित्र असलेले कुठलेही ओळखपत्र मतदान कक्ष अधिकाऱ्याला दाखवून मतदान करता येणार आहे    

 

                                                   12 प्रकारची ओळखपत्रे  

1) पासपोर्ट2) वाहन चालविण्‍याचा परवाना ( ड्रायव्हींग लायसन्स ),  3) केंद्र आणि राज्‍य सरकारच्या सेवेतील फोटोसहीत ओळखपत्र,  4) बँकेने दिलेले खातेदाराचे फोटो असणारे पासबुक, 5) आयकर विभागाकडील ओळखपत्र (पॅन कार्ड) मालमत्‍तेबाबतची कादपत्रे तसेच नोंदणी खत इत्‍यादी (फोटोसहित), 6) एनपीआर मधे आरजीआय चे स्मार्ट कार्ड, 7) महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड, 8) केंद्र शासनाच्‍या कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्‍य विमा योजनेचे फोटोसहित ओळखपत्र, 9) पेन्शनचे फोटोसहीत दस्तऐवज, 10) लोकसभा सदस्य विधान मंडळ सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, 11) आधार ओळखपत्र, 12) मतदार ओळखपत्र  यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

 

त्‍यामुळे मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानाला जातेवेळी यातील एक ओळखपत्र म्‍हणून सोबत आणावेअसे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.  तसेच यावेळी निवडणुकीत मतदारांच्‍या उजव्‍या हाताच्‍या तर्जनीवर मतदान केल्‍याची शाई लावण्‍यात येणार आहे 
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result