महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक खर्च पथकांनी अधिक कार्यक्षमपणे काम करावे - जिल्हाधिकारी शनिवार, १६ मार्च, २०१९


कोल्हापूर :
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदार संघनिहाय नियुक्त केलेल्या निवडणूक खर्च पथकांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अधिक कार्यक्षमपणे काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

जिल्हास्तरीय निवडणूक खर्च सनियंत्रण व व्यवस्थापन समितीच्या वतीने 47 कोल्हापूर आणि 48 हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठीच्या जिल्हास्तरीय तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक खर्च निरीक्षकांचे अन्य पथकांच्या प्रमुखासाठी सक्रीट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृहात आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई बोलत होते. त्याच्यासमवेत अतिरीक्त जिल्हाधिकारी तथा हातकणंगले मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हास्तरीय निवडणूक खर्च समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक खर्च निरीक्षक ए. जी. देसाई व प्रताप गोटखिंडे, एमसीएमसीचे नोडल अधिकारी धनंजय आधळे, बॅक समितीचे नोडल अधिकारी राहूल माने, जिल्हा स्तरीय खर्च समितीचे सहाय्यक नोडल अधिकारी बाबासाहेब जाधव यांच्यासह सर्व संबधित समित्यांचे नोडल अधिकारी आणि अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भारत निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लोकसभा निवडणूकीसाठी जिल्हास्तरावर विविध 18 समित्या कार्यान्वित करण्यात आल्याचे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, सर्व समित्यांना त्यांच्या त्यांच्या कामकाजाची माहिती प्रशिक्षणाद्वारे देण्यात आली आहे. संबधित समित्यातील अधिकारी कर्मचारी आपले काम अधिक कार्यक्षम पणे व्हावे यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तरतुदी आणि सूचनांचा अभ्यास करावा याबरोबरच आयोगाकडून वेळोवेळी येणाऱ्या सुधारणा आणि माहितीनुसार आपआपल्या पथकाची कामगिरी चोखपणे बजावावी अशी सूचनाही त्यांनी केली.

जिल्हास्तरीय निवडणूक खर्च सनियंत्रण व व्यवस्थापन समिती आणि वतीने कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठीच्या विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक खर्च निरीक्षकांच्या पथकांनी परस्पर समन्वय जोपासून निवडणूक कामकाज करावे अशी सूचना करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, निवडणूकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष तसेच उमेदवारांकडून प्रचारासाठी होणारा दैनंदिन खर्च समितीला तात्काळ देणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाच्या बाबींबाबत सहाय्यक खर्च निरीक्षकांनी अधिक दक्ष देऊन आपली भूमिका बजावावी.

जिल्हास्तरीय निवडणूक खर्च सनियंत्रण व व्यवस्थापन समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने जिल्हास्तरावरील ईईएम, एमसीएमसी, तक्रार निवारण व कॉल सेंटर, जिल्हास्तरीय बँक समितीने राजकीय पक्ष व उमेदवारांच्या खर्चाबाबतची माहिती विहीत नमुन्यात तात्काळ देणे गरजेचे आहे. तसेच विधानसभा मतदार संघ निहाय नियुक्त व्हीएसटी, व्हीडीओ, फ्लाईग स्कॉड, एसएसटी आदी पथकांनी योग्य समन्वय जोपासून निवडणूक विषयक कामकाज अधिक चोख पणे करावे अशी सूचनाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली. सर्व समितीत्यांची माहिती व त्याचे कामकाज हे निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आले असून, प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसातून किमान २ तास निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरुन समितीच्या कामकाजाबाबत वाचन करावे, अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामास सर्वोच्य प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली.

जिल्हास्तरीय पथकाने तसेच सर्व समित्यातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या निवडणूक विषयक कामकाजाची अद्ययावत माहिती घेऊन निवडणुक कामकाज सुरळीतपणे पार पाडावे, अशी सूचना करून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी निवडणूक आयोगाच्या खर्च विषयक कार्यपध्दतीची सविस्तर माहिती दिली.

जिल्हास्तरीय निवडणूक खर्च समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने यांनीही यावेळी सर्व सहाय्यक खर्च निरीक्षक आणि त्याच्या टिमला तसेच अन्य जिल्हास्तरीय पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी करावयाच्या कामाची सविस्तर माहिती दिली. प्रारंभी जिल्हास्तरीय खर्च समितीचे सहाय्यक नोडल अधिकारी बाबासाहेब जाधव यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात खर्च समितीच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली.

या प्रशिक्षण क्षेत्रात सर्व विधानसभा मतदार संघातील सहाय्यक खर्च निरीक्षक व त्यांच्या पथकातील अधिकारी कर्मचारी तसेच एमसीएमसी कमिटीचे सर्व अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result