महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विधानसभा
शुक्रवार, २३ मार्च, २०१८
स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनातर्फे प्रभावी अंमलबजावणी - डॉ. दीपक सावंत
विधानसभा प्रश्नोत्तरे : मुंबई : गतवर्षी झालेल्या नागरी परीक्षणानंतर हजार मुलांमागे मुलींचा ९०४ एवढा दर असल्याचा अहवाल आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासंदर्भात शासन प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. ४१६ संशयित सोनोग्राफी केंद्राचा पाठपुरावा करीत आहोत. डिसेंबर...
शुक्रवार, २३ मार्च, २०१८
पेण येथील शिक्षण लेखाधिकार कार्यालय अलिबागला स्थलांतरित करणार - विनोद तावडे
विधानसभा लक्षवेधी : मुंबई : अलिबाग तालुक्याचे शिक्षण विभागाचे लेखाधिकार कार्यालय महिनाभरात पेण येथून अलिबाग येथे स्थलांतरित करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितले. यासंदर्भात सदस्य सुभाष पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी...
गुरुवार, २२ मार्च, २०१८
राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालये स्थापन करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यात पिंपरी- चिंचवड, मीरा-भाईंदर आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी पोलीस आयुक्तालये स्थापन करण्यात येणार आहेत; त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. गृह विभागाच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या...
गुरुवार, २२ मार्च, २०१८
हायब्रीड ॲन्युइटीच्या माध्यमातून नवीन रस्त्यांच्या कामासाठी अर्थसंकल्पात तरतूद : चंद्रकांत पाटील
ऑक्टोबरमध्ये कार्यारंभ आदेश मुंबई : नवीन रस्त्यांच्या बांधकामासाठी हायब्रीड ॲन्युईटीसाठी केलेली 3 हजार कोटी रुपयांची तरतूद पुरेशी असून येत्या ऑक्टोबरच्या दरम्यान या रस्त्यांच्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री...
गुरुवार, २२ मार्च, २०१८
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जाहीर केले. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अर्थसंकल्पीय अनुदानावरील चर्चेदरम्यान उपस्थित करण्यात...
Showing Page: 1 of 25