महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार - पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०


औरंगाबाद
 : 
आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर पर्यटन जिल्हा म्हणून औरंगाबाद जिल्ह्याचे महत्वपूर्ण स्थान आहे. त्यादृष्टीने  जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांच्या   विकास कामांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करुन दिला जाईलअसे प्रतिपादन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील पर्यटन विकास कामांच्या आढावा बैठकीत श्री.ठाकरे  बोलत होते.  बैठकीस पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासह खासदार इम्तियाज जलीलआमदार अंबादास दानवेमहापौर नंदकुमार घोडेलेजिल्हाधिकारी उदय चौधऱीमहानगर पालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांच्यासह इतर सर्व संबंधित लोकप्रतिनिधीअधिकारी उपस्थित होते.

श्री.ठाकरे यांनी यावेळी जिल्ह्यातील सर्व  पर्यटन स्थळी पूरक सोयीसुविधा असणे गरजेचे आहे. जेणेकरुन पर्यटक संख्येत वाढ होऊन येथे रोजगाराच्या संधी विस्तारण्यास चालना मिळेल. त्यादृष्टीने  पर्यटन स्थळांच्या विकासकामाला कालमर्यादेत गुणवत्तापूर्णरित्या पूर्णत्वास न्यावे असे सांगून श्री.ठाकरे यांनी वेरुळ घृष्णेश्वर विकास आराखड्यातंर्गत करण्यात येत असलेल्या विकास कामांची माहिती घेतली. वेरुळ घृष्णेश्वर याठिकाणी संयुक्त बायपास रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या 22 कोटींचा निधीच्या  नियोजन विभागाकडे पाठवलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल. या बायपास रस्त्यामुळे येथील वेरुळ अभ्यागत केंद्राला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल, असे श्री.ठाकरे यांनी सांगितले. तसेच दौलताबाद किल्ल्याच्या बाहेर असलेल्या ऐतिहासिक दरवाज्याच्या बाजूने रस्ता तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीकरीता राज्य तसेच केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे श्री.ठाकरे यांनी  यावेळी सांगितले.

पालकमंत्री यांनी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देत सर्व यंत्रणांनी समन्वयपूर्वक विहीत कालमर्यादेत विकास कामे पूर्ण करावीत. प्राप्त निधीचा योग्य विनियोग करत जिल्ह्यातील विकास कामे दर्जेदाररित्या पूर्ण करावीत,अशा सूचना यावेळी संबंधितांना दिल्या.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी तयार केलेल्या औरंगाबाद पर्यटनाबाबत माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचे विमोचन यावेळी पर्यटन मंत्री श्री.ठाकरे आणि पालकमंत्री श्री.देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्हयातील पर्यटन विकास कामांची माहिती दिली.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा