महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाराष्ट्रातील माहोल एकदम सुरक्षित... आय लाईक इट ! शुक्रवार, ११ जानेवारी, २०१९


पुणे : खेलो इंडिया स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रात आलोय... महाराष्ट्र शासनाने एकदम चांगली व्यवस्था केली आहे. आम्हाला आतापर्यंत काहीच अडचण आली नसून महाराष्ट्रातील माहोल एकदम सुरक्षित असल्याचे सांगत “आय लाईक इट” अशी उत्स्फुर्त प्रतिक्रिया अरुणाचल प्रदेशच्या कुस्ती संघाचे प्रशिक्षक दारी लोकम यांनी आज दिली.

खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाळुंगे-बालेवाडी येथे कुस्तीचा संघ घेऊन आलेले दारी लोकम पुढे म्हणाले, अरूणाचल प्रदेशचा कुस्तीचा संघ पहिल्यांदाच खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी झाला आहे. कुस्तीचे दोन खेळाडू आम्ही स्पर्धेत उतरवले आहेत. येथील खेळाडूंची तयारी बघता आम्हाला पदकांची फारशी अपेक्षा नाही, मात्र आमचे खेळाडू सर्वांची मने नक्कीच जिंकतील. या स्पर्धेच्या निमित्ताने चांगला मंच आमच्या खेळाडूंना उपलब्ध झाला आहे.

या ठिकाणचा माहोल एकदम चांगला आहे, खेळाचे वातावरण चांगले आहे. अशा प्रकारची स्पर्धा प्रत्येक वर्षी घेतली तर त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम पुढच्या पिढीसाठी होईल. स्पर्धेचे आयोजन एकदम नेटके आणि सुंदर केले असल्याचे श्री.लोकम यांनी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा