महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देणार- पालकमंत्री सवरा बुधवार, ०८ नोव्हेंबर, २०१७
शासकीय आश्रमशाळा, नंडोरे येथील शाळा इमारतीचे उदघाटन संपन्न

पालघर :
आदिवासी भागात चांगल्या शैक्षणिक सोयी-सुविधा देऊन त्या विद्यार्थ्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केले.

शासकीय आश्रमशाळा, नंडोरे येथील शाळा इमारतीच्या उद्घाटनप्रंसगी श्री. सवरा बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, आमदार पास्कल धनारे, आदिवासी विकास विभागाच्या सचिव श्रीमती मनीषा वर्मा, आदिवासी विकास विभाग ठाणेचे अप्पर आयुक्त सी. के. डांगे आदी उपस्थित होते.

श्री.सवरा म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी नामांकित इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट मदत देण्यात आली आहे. आदिवासी आश्रमशाळामध्ये इंग्रजी व विज्ञान विषयांची गूणवत्ता वाढविण्यासाठी कराडी पथ व एकलव्य उपक्रम राबविले जाणार आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांनी आपला शैक्षणिक दर्जा उंचवावा तसेच मेहनत घेऊन शिस्तीचे पालन करावे.

आदिवासी आश्रमशाळा स्वच्छता अभियान व कायापालट अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अनुदानित व बिगर अनुदानित शाळांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी विज्ञान आणि हस्तकला प्रदर्शन तसेच आदर्श आश्रमशाळा प्रतिकृतीची पाहणी केली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा