महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकराज्यच्या ‘पोलीस विशेषांकाचे’ अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या हस्ते विमोचन शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८
जालना : ‘आपले पोलीस - आपली अस्मिता’ या लोकराज्यच्या अंकाचे विमोचन अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्या हस्ते आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आले.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, दै. दुनियादारीचे पत्रकार किशोर आगळे, माहिती सहायक अमोल महाजन यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती फड म्हणाल्या की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या कामगिरीवर आधारित जानेवारी, 2018 चा लोकराज्यचा दर्जेदार व वाचनीय असा अंक प्रकाशित केला आहे. लोकराज्य अंकामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती असल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त असा अंक असुन प्रत्येकाने ‘लोकराज्य पोलीस विशेषांक’ अवश्य घ्यावा, असे आवाहनही श्रीमती फड यांनी केले.

शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य हे मासिक शहरातील तसेच जिल्ह्यातील बुकस्टॉलवर उपलब्ध आहे. लोकराज्य मासिकाच्या वार्षिक वर्गणीसाठी जिल्हा माहिती अधिकारी प्रशासकीय ईमारत, तळमजला, येथे वार्षिक वर्गणी भरुन अंक घरपोच पोस्टाद्वारे पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लोकराज्य उपयुक्त आहे. त्यामुळे विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांनी वार्षिक वर्गणी भरुन अंक प्राप्त करण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी एस.के.बावस्कर यांनी यावेळी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा