महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वाघिणीचा मृत्यू वृद्धापकाळामुळे गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१९

चंद्रपूर : दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीचा मृत्यू वृद्धापकाळामुळे तसेच दात संपूर्णपणे झीजल्यामुळे शिकार करून शिकार भक्षण करण्यास सक्षम नसल्यामुळे झालेला आहे, असा खुलासा वन विभागाने केला आहे.

दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी वनरक्षक तसेच इतर वनमजूर सायंकाळी 5 वाजता गस्त करीत असताना मोहनी नाल्यामध्ये एक वयस्क वाघ पडून असल्याचे दिसून आले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून यासंदर्भात माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी डी.बी. वडेट्टीवार यांनी 6 वाजून 45 मिनिटांनी चौकशी केली असता ही वाघीण मृतावस्थेत आढळून आली. वाघिणीचे संपूर्ण अवयव शाबूत होते. त्या वाघिनीचे वय 12 ते 13 वर्ष असून शरीर यष्टी कमजोर दिसून आली. वाघिणीच्या मृत्यूबाबत प्राथमिक अंदाजानुसार वाघिणीचा मृत्यू वृद्धापकाळामुळे झालेला आहे. त्यानंतर वाघिणीला चंद्रपूर येथे हलवण्यात आले. वाघिणीचे शवविच्छेदन करून सर्व अवयवासोबत अग्निमधे जाळून नष्ट करण्यात आले. यावेळी मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे, मुकेश भांडककर, डॉ.रविकांत खोबरागडे, डॉ.ताजणे, डॉ.पोडचेलवर प्रामुख्याने उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा