महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी बनविली शाडूची गणेशमुर्ती;पर्यावरण रक्षणाचे आवाहन सोमवार, ०७ ऑगस्ट, २०१७
अकोला : पर्यावरण व संस्कृती रक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मातीच्या मूर्ती स्थापनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शाडू मातीपासून इको फ्रेंडली गणपती बनवून तो स्थापन करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. या संकल्पनेचा एक भाग म्हणून स्वत: पालकमंत्री व त्यांच्या पत्नी डॉ. अपर्णा पाटील यांनी आपल्या घरी शाडू मातीपासून गणपती बनविला व ही मूर्ती घरी स्थापन करण्याचे ठरविले.

यावेळी शरद कोकाटे, निलेश निकम, संजय सेंगर, चेतन ढोरे, राज पाटील, दीपक पाटील, हरिषभाई अलीमचंदानी, शरद सोमरे हे उपस्थित होते. सर्व गणेशभक्तांनीही शाडू मातीपासून बनविलेला गणपती बसवावा, जेणेकरून निसर्गासोबतच पाणीही दूषित होणार नाही, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा