महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्हा माहिती कार्यालय आयोजित `विकास संवाद` कार्यशाळा उत्साहात संपन्न गुरुवार, १२ ऑक्टोंबर, २०१७
अलिबाग : शासन यंत्रणेला विकास विषयक उपक्रम राबविताना माध्यमे ही योग्य अशा प्रसिद्धीतून आवश्यक प्रतिसाद देत असते. याद्वारे शासकीय यंत्रणेला योग्य त्या सुधारणा करण्यास वाव मिळतो. एक प्रकारे माध्यमे ही शासनाची ज्ञानेंद्रियच आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित `विकास संवाद` कार्यशाळेचे आज जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

शासनाच्या विविध विभागांनी गेल्या तीन वर्षात केलेल्या कामगिरीचा आढावा सादर करुन त्यासंदर्भात माध्यमांमधील तज्ज्ञ संपादक, प्रतिनिधी यांच्याशी विचारविनिमय करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात `विकास संवाद` कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी प्रा.वालेकर तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर, कोकण विभागाचे विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, सहकार भारतीचे प्रा. उदय जोशी, अनुलोमचे रवींद्र पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव तसेच मान्यवर संपादक व पत्रकार उपस्थित होते. यावेळी शासनाचे विविध विभागांमार्फत जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात झालेल्या कामगिरीचा आढावा सादर करण्यात आला. यावेळी विविध विभागप्रमुखही उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा