महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
हिंजवडीतील वाहतूक समस्येचा पालकमंत्री बापट यांनी घेतला आढावा मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७
पुणे : पालकमंत्री गिरीश बापट यांनी हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्येचा आढावा घेतला. तसेच या समस्यांवर तत्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी सौरभ राव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, हिंजवडी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी संतोष देशमुख उपस्थित होते.

हिंजवडी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील रस्त्यांचा विकास, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, अतिक्रमणे, सध्या सुरु असलेल्या रस्ते विकासांचे कामे, व्यावसायिक कर व कचरा प्रशनांबाबत पालकमंत्री बापट यांनी हिंजवडी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्या (एचआयए) पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.

वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी लवकरच पालकमंत्री श्री बापट, जिल्हाधिकारी सौरभ राव व इतर संबंधित अधिकारी हिंजवडी परिसराची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहेत. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस दलातील अधिकारी व हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा