महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
`महाराष्ट्र वार्षिकी 2017`चे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रकाशन बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७
औरंगाबाद : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या `महाराष्ट्र वार्षिकी 2017`चे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ठेवीदार, कर्जदारांना रुपे किसान क्रेडिट कार्ड वाटपाच्या सोहळ्यात हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ‘महाराष्ट्र वार्षिकी’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांच्यासह उपाध्यक्ष यांच्यासह संचालक सदस्य यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘महाकर्जमाफी’ या पुस्तिका उपस्थितांना मोफत देण्यात आल्या. या पुस्तिकेमध्ये ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात कर्जमाफी या विषयावर मा.मुख्यमंत्र्यांनी दिलेली इत्यंभुत माहितीचा समावेश आहे.

महाराष्ट्र वार्षिकी या ग्रंथामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, जनजीवन, शासनाच्या विविध योजना, महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ, विधी मंडळ सदस्य, संसद सदस्य इतक्या विविध स्वरुपातील महत्वाच्या माहितीचा साठा एकाच ग्रंथात उपलब्ध करुन दिला आहे. `महाराष्ट्र वार्षिकी` हा ग्रंथ वाचनीय, उपयुक्त अणि अधिकृत संदर्भ ग्रंथ असून प्रत्यकाने तो संग्रही ठेवावा. या पुस्तकाची किंमत 300/- रुपये असून जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद येथे ही पुस्तिका विक्रीसाठी उपलब्ध आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा