महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राज्य शासन शहीद तौसिफ शेख यांच्या कुटूंबियांच्या पाठिशी - पालकमंत्री पंकजा मुंडे शुक्रवार, १० मे, २०१९


बीड :
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातील शहीद जवान तौसिफ आरेफ शेख यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज भेट घेवून त्यांचे सांत्वन केले व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला.

नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाटोदा येथील तौसिफ शेख हा जवान शहीद झाला होता. पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी आज पाटोदा येथे शहीद तौसिफ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. राज्य शासन त्यांच्या कुटूंबियांच्या मागे खंबीरपणे उभा आहे असे सांगून त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, त्यांचे बलिदान व शौर्य कदापि विसरणार नाही, असे मंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

यावेळी शेख तौसिफ यांचे वडील शेख आरेफ, आ. भीमराव धोंडे, आ. सुरेश धस आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा