महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
एनआरएलएम योजनेच्या प्रशिक्षणार्थी व लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेशाचे वाट शुक्रवार, ११ जानेवारी, २०१९


चंद्रपूर : चांदा क्लबवर आयोजित कृषी प्रदर्शन व सरस महोत्सवामध्ये जिल्ह्यातील सुक्ष्म गुंतवणूक निधी अंतर्गत ग्राम संघाना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेशाचे वाटप आज करण्यात आले. त्यामध्ये जनकल्याण ग्रामसेवा संघ, जिजाऊ ग्रामसेवा संघ, भाग्यलक्ष्मी ग्रामसेवा संघ, साईबाबा ग्रामसेवा संघ व सावित्रीबाई फुले ग्रामसेवा संघ या ५ ग्रामसेवा संघाना एनआरएलएम अंतर्गत वाटप करण्यात आले.

जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत पोंभुर्णा तालुक्यातील निर्मल स्वयंसहायता समुह, ओमसाई स्वयंसहायता समुह व शेवंती स्वयंसहायता समुह या स्वयंसहायता समुहांना इंडियन बँकेतर्फे धनादेश वितरीत करण्यात आले.

एनआरएलएम अंतर्गत दिनदयाल ग्रामीण कौशल्य योजना या योजनेमार्फत चिमुर तालुक्यातील निखील श्रीकृष्ण शामकुळे, संदिप पुरूषोत्तम लोखंडे, पंकज शामराव शेंडे व दर्शना दयाराम मुन या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणर्थ्यांना पालकमंत्री यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

दिनांक १ एप्रिल २०१८ ते ९ जानेवारी २०१९ या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बँकांनी ४४४१ गटांना ४० कोटी ७० लाख ८१ हजार रुपयाचे कर्ज वाटप करुन राज्यात सर्वात जास्त कर्ज वाटप करणारा जिल्हा असे नावलौकिक केले आहे.

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियाना अंतर्गत परंपरागत कृषि विकास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश गटातील सेंद्रीय शेती करणारे शेतकऱ्यांचा शेतमाल वाहतूक करण्याकरीता वाहन खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात आला. यामध्ये कोरपना तालुक्यातील पकडीगुडम सेंद्रीय शेती गट धानोलीचे लाभार्थी लिंगा वेट्टी यांना मारूती सुझुकी सुपर कॅरी 740 किलो वाहक क्षमता असणारे वाहन खरेदीसाठी बँकेतर्फे 4 लाख रु.चे कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच बल्लारपूर तालुक्यातील सेद्रीय भात उत्पादक गट किन्ही या गावातील लाभार्थी शंकर अर्जून गव्हारे यांना महिंद्रा बोलेरो पिकअप 1.7 मेट्रीक टन वाहक क्षमता असणारे7 लक्ष 29 हजार रूपये किमतीचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा