महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कृषीमंत्री फुंडकर यांनी पालकमंत्र्यांसह केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी सोमवार, २० मार्च, २०१७
अकोला : अकोला जिल्ह्यासह राज्यात गारपीट झाली त्यात रब्बी हंगाम आणि फळबागाचे नुकसान झाले. रविवार दि. 19 मार्च 2017 रोजी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आणि पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी पातूर तालुक्यातील तांदळी गावातील गजानन नाकट यांच्या शेतातील कांदा पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.

यावेळी पातूरचे तहसीलदार राजेश वजीरे, मोतीराम पाटील, प्रवीण देशपांडे, संबधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुका हा रब्बीचा आणि बागायतीचा असल्यामुळे मागच्या आठवड्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. शासनाच्या आणि पालकमंत्र्याच्या सूचनेवरुन तात्काळ पंचनामेही करण्यात आले आहेत. रविवारी अधिवेशनाला सुट्टी असल्यामुळे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आणि पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी हा दौरा आयोजित केला होता. ज्या-ज्या शेतककऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना शासन योग्य ते मदत करेल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी‍ दिली.

कुस्ती स्पर्धेची पाहणी

होळी महोत्सवानिमित्त सुधाकरराव नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, शेकापूर फाटा, कार्ला, ता. पातूर येथे स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्या स्पर्धेला कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आणि पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा