महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
चांगला समाज व देश घडविण्यासाठी सकारात्मक विचार करायला हवा - पराग सोमण शनिवार, ०६ जानेवारी, २०१८
उस्मानाबाद : वृत्तपत्रामध्ये समाजमनाचे व प्रशासनाचे योग्य ते रुप दिसले पाहिजे, यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुन चांगला समाज व देश घडविण्यासाठी सकारात्मक विचार करायला हवा, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी पराग सोमण यांनी आज व्यक्त केले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने दर्पणदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री.सोमण हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते हे होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष महेश पोतदार, पत्रकार कमलाकर कुलकर्णी, प्रशांत कावरे, धनंजय पाटील, राजाभाऊ वैद्य, देविदास पाठक, शिला उंबरे, संतोष हंबीरे, मच्छिंद्र कदम, सुभाष कदम, भिमाशंकर वाघमारे, हुंकार बनसोडे, भाऊसाहेब अणदुरकर, कलीम मुसा सय्यद, श्री.जी.बी.राजपूत, संतोष खुने, आकाश नरोटे, मल्लिकार्जून सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

श्री.सोमण म्हणाले की, पत्रकारासाठी सकारात्मक कायदे देखील झाले आहेत, यामध्ये आर्थिक बाबींचा देखील विचार करण्यात आला आहे. यावेळी डॉ.कोलते यांनी अध्यक्षीय समारोपात शासनाच्या विविध विकास योजनाचा रथ पुढे नेण्याचे काम पत्रकारांचे मोलाचे सहकार्य लाभते, त्यामुळे पत्रकार व प्रशासन मिळून चांगले काम करु या, असे आवाहन यावेळी केले.

यावेळी पत्रकार धनंजय रणदिवे, देविदास पाठक व संतोष हंबीरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी मानले. यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने पत्रकारांची मौखिक आरोग्य तपासणी व मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी करण्यात आली. तसेच लोकराज्य, महाकर्जमाफी, सामाजिक न्यायाच्या दिशेने, कथा परिर्वनाची – दर्शन समृद्धीचे, बदलत्या महाराष्ट्राचे आदी पुस्तकांचे यावेळी पत्रकारांना वाटप करण्यात आले. यावेळी उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे व उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य व जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा