महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मावळ लोकसभा मतदारसंघ उमेदवारांचे दैनंदिन लेखे, रोख नोंदवही तपासणी वेळापत्रक जाहीर सोमवार, १५ एप्रिल, २०१९
पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन खर्च विषयक लेखे, रोख नोंदवही व बँक नोंदवही याची तपासणी करण्यात येते. मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या लेख्यांचा तपासणी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १५ एप्रिल, २० एप्रिल आणि २७ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे दरम्‍यान मावळ लोकसभा मतदारसंघ, पुणे यांचे कार्यालय, सहावा मजला, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी, पुणे येथे निवडणूक खर्च निरीक्षक हे उमेदवारांचे दैनंदिन खर्च विषयक लेखे, रोख नोंदवही व बँक नोंदवहीची तपासणी करणार आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी कळविले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा