महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणी दिल्या भेटी गुरुवार, २० एप्रिल, २०१७
पालघर : विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा पालघर जिल्हा दौरा 20 एप्रिल 2017 या रोजी आयोजित दौऱ्याच्या अनुषंगाने ह्या समितीने जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, पाली या भागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतीगृह तसेच विविध योजनांची कामे चालू आहेत त्याठिकाणी भेटी दिल्या. सदर भेटी विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार रूपेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली विविध ठिकाणी भेटी दिल्या. या समितीमध्ये सर्वश्री आमदार वैभव पिचड, पांडुरंग बरोरा, आनंदभाई ठाकूर,ॲङ निरजंन डावखरे, राजू तोडसाम, पास्कल धनारे, काशीराम पावरा, चंद्रकांत सोनवणे, संजय पूराम, डॉ.अशोक उइके, उपसचिव ना.रा.थिटे, ए.बी. रहाटे कक्ष अधिकारी, अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

सदर भेटीमध्ये जव्हार येथील अन्नधान्याचे शासकीय गोडाऊनची पाहणी केली. सदर गोडाऊनमध्ये कंपाऊड गेट बांधण्यात यावे अशा सुचना संबंधित विभागांना दिल्या. न्याहाळे बुद्रूक येथील आरोग्य उपकेंद्र नांदगाव येथे भेट दिली. आदिवासी आश्रमशाळा पळसुंडा, कळंमवाडी येथील कुपोषणग्रस्त मयत झालेल्या सागर वाघ यांच्या आईवडीलांची भेट घेऊन त्यांना आतापर्यंत शासनाकडून मिळालेल्या मदतीची विचारपूस केली. तसेच आदिवासी विभागाअंतर्गत बांधण्यात आलेल्या पोलीस सैन्य प्रशिक्षण केंद्राची पहाणी केली. सदर इमारतीचे बांधकाम तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच आरोग्य विभागाच्या पळंसुडा निवासस्थानाची पाहणी केली. तसेच कृषी विभागाअंतर्गत डोल्हारे येथील शेततळ्याची पाहणी केली. वन विभागाअंतर्गत कासटवाडी येथील वनोपज तपासणी नाक्याची पाहणी केली. तसेच जिल्हा परिषदशाळा डेग्यांची मेट, तलावली आश्रमशाळा येथे भेट दिली. मौजे उंबरवागंण सामूहिक मोगरा लागवड, साखरे गावठन ते आंबोरे पाड रस्ता, ग्रामीण रुग्णालय विक्रमगड, वसुरी बोरसेपाडा रस्ता, जिल्हा परिषद पाणीपूरवठा योजना, पाली नळपाणी योजना, पिंगेमान जोडरस्ता तयार करणे, चणेमान जोडरस्ता तयार करणे, प्राथामिक आरोग्य केंद्र गो-हे, आपटी सिमेंट नाला बंधारा, आंबिस्ते आश्रमशाळा अशा विविध ठिकाणी भेट देऊन संबंधित कामाची पाहणी केली. सदर पाहणी दौऱ्यात विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा