महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची वैजनाथ देवस्थानाला भेट रविवार, ०८ ऑक्टोंबर, २०१७
बीड : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज परळी येथील श्री वैजनाथ देवस्थानाला भेट दिली. यावेळी मा. राज्यपाल यांनी श्री वैजनाथाची विधीवत पुजा करुन दर्शन घेतले.

यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, वैद्यनाथ मंदिर देवस्थानचे सचिव राजेश देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी मंदिर देवस्थानाकडून सचिव श्री. देशमुख यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचा श्री वैजनाथाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी सकाळी 9.50 वाजता राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे गोपीनाथ गड हेलिपॅडवर आगमन झाले. आगमानानंतर राज्यपाल यांनी गोपीनाथ गडावरील स्व.गोपीनाथ मुंडे समाधी स्थळी भेट दिली व समाधीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा