महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन मंगळवार, ०९ ऑक्टोंबर, २०१८
अकोला : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दरमहा प्रकाशित होणाऱ्या ‘लोकराज्य’ या मासिकाचा माहे ऑक्टोबरचा ‘महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा’ या विशेषांकाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते नुकतेच अकोला येथील एका कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले.

यावेळी याप्रसंगी आमदार गोपीकिशन बाजोरिया, नगरसेवक सर्वश्री हरिष अलीमचंदाणी, गिरीश गोखले, अशिष पवित्रकार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण आदी उपस्थित होते.

लोकराज्यच्या माहे ऑक्टोबरच्या विशेषांकात महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीनिमित्त परिवर्तन ह्या सूत्राने महाराष्ट्रात होत असलेल्या परिवर्तनाची स्पंदने टिपण्यात आलेली आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधींविषयी ‘युगपुरुषाचा आदर्श’ हा लेख लिहून महात्मा गांधींच्या मार्गदर्शक वाटचालींचा व विचारांची वाटचाल मांडून आपली आदरांजली व्यक्त केली. या विशेषांकात राज्य शासनाच्या विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागात होत असलेल्या परिवर्तनाच्या यशकथा मांडण्यात आल्या आहेत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा