महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पुणे, अहमदनगर आणि बडनेरा रेल्वे स्थानके स्वच्छतेत देशात आघाडीवर बुधवार, १७ मे, २०१७
राज्यातील एकूण 38 रेल्वे स्थानकांचा समावेश

नवी दिल्ली :
देशातील स्वच्छ रेल्वे स्थानकांची यादी आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केली. यादीत अ 1 श्रेणीत महाराष्ट्रातील पुणे रेल्वे स्थानकाने 9 वे स्थान पटकावत पिुल्या दहात स्थान मिळवले. तर, अ श्रेणी मध्ये अहमदनगर ने तिसऱ्या व बडनेरा रेल्वे स्थानक सहाव्या स्थानावर आहे.

रेल्वे भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी देशातील स्वच्छ रेल्वे स्थानकांचा समावेश असलेल्या ‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांची नावे जाहीर केली. यावेळी रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहन आणि रेल्वे बोर्डाचे ए.के.मित्तल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यादीत अ 1 श्रेणीत महाराष्ट्रातील 10 रेल्वे स्थानकांचा तर, अ श्रेणी मध्ये 28 अशा एकूण 38 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

रेल्वे मंत्र्यांनी पुणे, बडनेरा व लोणावळा रेल्वे स्थानकांचे केले कौतुक
यावेळी बोलताना रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी देशातील रेल्वे स्थानकांवर स्वच्छतेबाबत होत असलेल्या सुधारणांबाबत समाधान व्यक्त केले. त्यांनी यावेळी पुणे व लोणावळा रेल्वे स्थानकांचा विशेष उल्लेख करत या रेल्वे स्थानकांनी मागील वर्षी पेक्षा स्वच्छता यादीत केलेल्या सुधारणेबाबत कौतुक केले. ते, म्हणाले, गेल्यावर्षी 75 व्या स्थानावर असलेल्या पुणे रेल्वे स्थानकाने आपल्या कामात महत्त्वपूर्ण सुधारणा करीत पहिल्या 10 स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत स्थान मिळवले आहे. या रेल्वे स्थानकावर समाजातील विविध घटकांच्या मदतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आल्याने हा बदल झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. बडनेरा रेल्वे स्थानकाने गत वर्षीच्या 269 व्या स्थानाहून थेट 6 व्या स्थानावर झेप घेतली आहे. लोणावळा रेल्वे स्थानकानेही 312 व्या स्थानाहून थेट 29 वे स्थान मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले.

असे झाले परिक्षण
गेल्या वर्षीपासून रेल्वे मंत्रालयाच्यावतीने ‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचे विविध मानकांवर नामांकित संस्थेच्यावतीने परिक्षण करण्यात येते. यावर्षीही देशातील रेल्वे स्थानकांचे दोन श्रेणींमध्ये परिक्षण करण्यात आले. ज्या रेल्वे स्थानकांहून वर्षाकाठी 50 कोटींपेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करतात अशा रेल्वे स्थानकांना अ 1 श्रेणी मध्ये तर 6 ते 60 कोटीं प्रवाशी प्रवास करणाऱ्या रेल्वे स्थानकांना ‘अ’ श्रेणी मध्ये ठेवण्यात आले. रेल्वे स्थानका शेजारील खुल्या परिसरात स्वच्छता गृह, मुख्य प्रवेश द्वारा शेजारी स्वच्छतागृह व अन्य स्वच्छता. तसेच रेल्वे स्थानकावर खुल्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था, विक्रेत्यांची व्यवस्था, स्वच्छतागृहांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रतिक्षालय, रेल्वे रूळ आणि पादचारी बाबींचे नीट निरीक्षण करून या रेल्वे स्थानकांना मानांकन देण्यात आले आहे. या सर्वांसाठी 1000 गुण ठरविण्यात आले होते पैकी विविध मानकानुसार गुणांकन करण्यात आले.

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या 7 स्थानकांचा यादीत समावेश
स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत मुंबई उपनगरीय रेल्वेच्या 7 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यात वांद्रे, मुंबई सेंट्रल, मुंबई सीएसटी, कल्याण जंक्शन, ठाणे, दादर आणि पनवेल या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील स्वच्छ रेल्वे स्थानके
अ 1 श्रेणी स्थानके

अ.क्र.

विभाग

रेल्वे स्थानक

श्रेणी

1

मध्य रेल्वे

पुणे जंक्शन

9

2

पश्चिम रेल्वे

बांद्रा

15

3

मध्य रेल्वे

सोलापूर

21

4

पश्चिम रेल्वे

मंबई सेंट्रल

27

5

मध्य रेल्वे

मुंबई सी.एस.टी

44

6

मध्य रेल्वे

नागपूर

54

7

मध्य रेल्वे

लोकमान्य टिळक टर्मिनस

60

8

मध्य रेल्वे

कल्याण जंक्शन

63

9

मध्य रेल्वे

ठाणे

68

10

मध्य रेल्वे

दादर

70


अ श्रेणी स्थानके

अ.क्र.

विभाग

रेल्वे स्थानक

श्रेणी

1

मध्य रेल्वे

अहमदनगर

3

2

मध्य रेल्वे

बडनेरा

6

3

मध्य रेल्वे

अमरावती

11

4

मध्य रेल्वे

बल्लारशाह

18

5

मध्य रेल्वे

चंद्रपूर

20

6

मध्य रेल्वे

वर्धा

21

7

मध्य रेल्वे

भुसावळ

24

8

मध्य रेल्वे

लोणावळा

29

9

मध्य रेल्वे

दौंड

42

10

मध्य रेल्वे

अकोला

45

11

मध्य रेल्वे

शिर्डी

51

12.

मध्य रेल्वे

लातूर

53

13

मध्य रेल्वे

कोपरगांव

54

14

पश्चिम रेल्वे

अंकलेश्वर

63

15

दक्षिण मध्य रेल्वे

परभणी जंक्शन

83

16.

दक्षिण पूर्व मध्य

गोंदिया

84

17

मध्य रेल्वे

कोल्हापूर

101

18

मध्य रेल्वे

मिरज जंक्शन

104

19

मध्य रेल्वे

पनवेल

111

20

मध्य रेल्वे

जलगांव

115

21

दक्षिण मध्य रेल्वे

नांदेड

116

22

मध्य रेल्वे

नाशिक रोड

123

23

दक्षिण मध्य रेल्वे

औरंगाबाद

131

24

दक्षिण मध्य रेल्वे

जालना

137

25

मध्य रेल्वे

मनमाड जंक्शन

175

26

मध्य रेल्वे

चाळीसगांव

186

27

मध्य रेल्वे

शेगांव

193

28

उत्तर पश्चिम रेल्वे

नागपूर

270


'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा