महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गोरगरीब मुलींच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करु- चंद्रकांत पाटील रविवार, ०४ नोव्हेंबर, २०१८
कोल्हापूर : गोरगरीब आणि वंचित कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी तसेच खेळाडू मुलींसाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्यात पुढाकार घेतला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना दिली.

श्री.पाटील यांच्या पुढाकाराने गोरगरीब मुलींच्या शिक्षणाला मदत करण्यात आली असून या मुलींना दिवाळीनिमित्त ड्रेस आणि फराळ देण्याचा कार्यक्रम येथील अयोध्या हॉटेलच्या सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. समारंभास नगरसेविका स्मिता माने, सामाजिक कार्यकर्त्या संगीता पवार, पणनचे विशेष लेखा परीक्षक बाळासाहेब यादव, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.

गोरगरीब कुटुंबातील एकही मुलगी पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, अशी व्यवस्था केली जाईल, असे सांगून श्री.पाटील म्हणाले, गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या दहावीनंतरच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याबरोबरच खेळाडू मुलींसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची भूमिका आहे. समाजातील सर्वच घटकांनी गोरगरीब मुलींच्या शिक्षणांची तसेच खेळाडू मुलींनाही सहाय्य करण्याची भूमिका स्विकारणे गरजेचे आहे.

प्रारंभी श्री. चिकोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा