महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
‘लोकसंवाद’मधून नांदेडच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी साधला संवाद बुधवार, ०२ जानेवारी, २०१९


नांदेड : जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना (नागरी व ग्रामीण) चा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून त्यांनी घेतलेल्या योजनेच्या लाभाबाबत माहिती घेतली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडीओ कॉन्फरन्स कक्षात त्यांनी विविध लाभार्थ्यांशी हा लाईव्ह संवाद साधला.

यावेळी अर्धापूर तालुक्यातील लहान या गावातील अस्मिता राजेश वाहेवळे, सुजाता दिगंबर सावंत, विशाखा राजू लोणे, विजया दिगंबर वाहेवळे तसेच नांदेड येथील माया विजय धुतराज, पंढीरानाथ पाबळे, सुदर्शन वाडेकर या लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधून घरासाठी लाभ घेतलेल्या योजनेविषयी माहिती दिली. प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेंतर्गत घराचा लाभ घेतलेले पार्वतीबाई देशमाने, खंडू डाके, संभा बरकमकर, शांताबाई जाधव, जिजाबाई बरडे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा