महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
निवडणूक खर्च निरीक्षक रंजन श्रीवास्‍तव यांची मीडिया सेंटरला भेट रविवार, १४ एप्रिल, २०१९


पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक रंजन श्रीवास्‍तव यांनी आज मिडीया सेंटरला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली.

यावेळी जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, सोशल मीडिया तज्ञ टी.पी. शर्मा, एस.बी. निकम आणि इतर अधिकारी उपस्थित होते. शिरुर लोकसभेसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून या मतदारसंघातील निवडणूक प्रचाराबाबतही त्‍यांनी माहिती जाणून घेतली. शिरुर लोकसभेसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्‍या फेसबुक, ट्वीटर यासारख्‍या सोशल मीडियावर तज्ज्ञांचे लक्ष असून नियमितपणे खात्‍यांची पाहणी केली जात आहे. तसेच आवश्‍यकतेनुसार पोलीस विभागाच्‍या सायबर सेलचीही मदत घेतली जात असल्‍याचे यावेळी सांगण्‍यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा