महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकारपणे पालन करावे- दिलीप जगदाळे बुधवार, १३ मार्च, २०१९


नंदुरबार : भारत निवडणूक आयेागाने 17 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली असून तेव्हापासून जिल्ह्यात सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी नंदुरबार 01 लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असून निवडणूक कामासाठी नेमण्यात आलेल्या स्कॉड व वेगवेगळ्या टीमचा आढावा अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी आज घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात श्री. जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्वच टीम व अधिकाऱ्यांचा आढावा घेतला. आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती जाणून घेत राहिलेल्या त्रुटीची तातडीने पुर्तता करण्याची कार्यवाही श्री. जगदाळे यांनी संबंधित स्कार्ड व टिमला दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) धनंजय निकम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी (ससप्र) जयसिंग वळवी उपस्थित होते.

श्री.जगदाळे यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या विविध टिमचा आढावा घेतला, त्यात उपलब्ध मनुष्यबळ, ई.व्हि.एम व्हि.व्हि पॅट, टास्कफोर्स, ट्रेनिंग मॅनेजमेंट, उपलब्ध साधन सामुग्री, खर्च, कायदा व सुव्यवस्था, बॅलेट पेपर एस.एम.एस, पोस्टल बॅलेट स्ट्रॉंगरुम, सायबर सेक्युरीटी, दिव्यांग मतदारांची व्यवस्था, वाहन व्यवस्था मतदान केद्रावर पिण्याचे पाणी, इलेक्ट्रीसिटी, शौचालय, मोबाईल रेंजसाठी, रनर, नियुक्त झोनल ऑफिसर्स, ट्रान्सपोर्ट, प्लॅन, कर्मचारी डाटा माहिती, मतदान केंद्रे, प्लॉईंग स्कॉड, सि-व्हिजील, सुगम, सुविधा समाधान, गोडावून व्यवस्था स्वीप कार्यक्रम, मिडीया सेंटर, इत्यादी निवडणूक कामात सहभागी झालेल्यांचा सविस्तर आढावा घेतला.

लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या प्रत्येक टिमने आपले काम जबाबदारीने करावे. सर्व कार्यरत टीमनी एकमेकांशी संवाद साधून आपले काम व्यवस्थित करावे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच मतदारसंघात भरारी पथके व अन्य पथके नेमण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी सी-व्हिजिल ॲप वापरण्यात येणार असुन या ॲपद्वारे सामान्य नागरीक तक्रार करु शकतील. तक्रारदारास 100 मिनिटात त्यांचे तक्रारीचे निराकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा