महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विधानभवन परिसरात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण शुक्रवार, ०८ जून, २०१८
पुणे : विधानभवन परिसरात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या विश्रामगृहाच्या एका कक्षाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

येथील विधानभवन परिसरात बांधण्यात आलेल्या विश्रामगृहाच्या एका कक्षाचे उद्घाटन डॉ. म्हैसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या परिसरात डॉ. म्हैसेकर यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, उपायुक्त (पुरवठा) दीपक नलवडे, उपायुक्त चंद्रकांत गुंडेवार, उपायुक्त उत्तम चव्हाण, कृषी अधिक्षक विनयकुमार आवटे यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा