महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मतमोजणी केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अत्यंत जबाबदारीने काम करावे -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत गुरुवार, ०९ मे, २०१९

लातूर : भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक  निवडणूक -2019 करिता  प्रसिध्द केलेल्या  कार्यक्रमानुसार 41-लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी लातूर शहरातील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे  दिनांक 23 मे 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता सुरु करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे करिता मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी -कर्मचाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मतमोजणीच्या अनुषंगाने नियुक्त नोडल अधिकाऱ्यांच्या  आढावा बैठकीत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त एम.डी.सिंह, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, अतिरिक्त पोलस अधक्षक हिम्मत जाधव, उपजिल्हाधिकारी (सा.) सुनील यादव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रदीप कुलकर्णी यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, मतमोजणीसाठी नियुक्त नोडल अधिकारी व त्यांच्या पथकातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतमोजणीच्या अनुषंगाने दिलेली जबाबदारीची सविस्तर माहिती करुन घ्यावी. त्याबाबतच्या शंकाचे निरसन करुन घ्यावे व आपली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडून मतमोजणीची प्रक्रिया यशस्वी करावी, असे त्यांनी सूचित केले.


तसेच मतमोजणी केंद्रात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी - कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही  व्यक्तीला प्रवेश नाही. त्याप्रमाणेच मतमोजणी केंद्रात मतमोजणीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षक यांच्याशिवाय कोणीही मोबाईल वापरण्यास आयोगाच्या निर्देशानुसार प्रतिबंध  असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. मतमोजणीचा फेरिनिहाय निकाल निवडणूक निर्णय अधिकारी हेच जाहीर करतील. त्या व्यतिरिक्त मतमोजणी केंद्रातून कोणीही अनाधिकृतपणे माहिती देणार नाहीत याची ही नोंद घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.


दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्यांनी प्रशंसा करुन मतमोजणीची प्रक्रिया ही यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.


यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी टपाली मतपत्रिका मोजणी पथक, मतमोजणी मनुष्यबळ व्यवस्थापन  पथक, साहित्य व्यवस्थापन पथक, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे सहाय्यक पथक, सिलींग पथकमतमोजणी समन्वय व अहवाल संकलन पथक या पथकांचा सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शन सूचना केल्या. त्याप्रमाणेच मतमोजणीच्या ठिकाणी  पोलस बंदोबस्त, आरोग्य  सुविधा, इंटरनेट सुविधा, डिया कक्ष, याबाबत ही माहिती घेऊन संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी चोखपणे काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा