महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राजधानीत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८
नवी दिल्ली : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.

कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी जनसंपर्क अधिकारी अमरज्यौतकौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु‍ निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार आणि उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्‍यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा : http://twitter.com/MahaGovtMic
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा