महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मतदानप्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्‍यासाठी प्रशासन सज्‍ज बुधवार, १० एप्रिल, २०१९गडचिरोली : 
12-गडचिरोली-चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिल  2019 रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसंदर्भातील आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली असून, मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे असून मतदारांनी जात
, धर्म किंवा आर्थिक प्रलोभन व आमिषांना बळी न पडता मतदान करावे. मतदान हा मतदारांचा हक्कही आहे तसेच ते कर्तव्यही आहे. मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी निर्भयपणे, कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रम तसेच मतदान केंद्रस्तरीय विशेष मतदार नोंदणी शिबिरामुळे 12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात मतदारांची संख्या 1580001 आहे. यामध्ये महिला मतदार 780275 पुरूष मतदार 799723  तर इतर 3  यांचा समावेश आहे.


12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात 1881  केंद्रांवर मतदान होणार आहे. या लोकसभा मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली, अहेरी, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व ब्रम्हपुरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.  गडचिरोली जिल्ह्यामध्ये 935 तर गोंदिया जिल्ह्यातील 310 व चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व ब्रम्हपुरी या मतदारसंघात मिळून 636 मतदान केंद्र आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या 4128 आहे.  1032 मतदान केंद्राध्यक्ष, 3096 मतदान अधिकारी 131, क्षेत्रीय अधिकारी 15 आहेत.


दिव्यांग मतदारांना मतदानासाठी सोईसुविधा उपलब्ध
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढावा यासाठी आयोगाकडून विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. मतदान केद्रावर अपंग व्यक्तींसाठी रॅम्पची सुविधा करण्यात आली असून अंध मतदार व्यक्तींसाठी इलेक्ट्रॅानिक व्होटींग मशिनवर ब्रेल लिपीची सुविधा देण्यात आली आहे. 2196 दिव्यांग मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. शारीरिक दिव्यांगासाठी एकूण 938 व्हीलचेअर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याशिवाय दिव्यांगाना सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात येत आहे. अंध मतदारांना ब्रेल लिपीच्या सहाय्याने मतदान करता येणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोय इत्यादी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

आरमोरी
, गडचिरोली ,अहेरी व आमगाव  विधानसभा मतदारसंघात सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यत मतदान ब्रम्हपूरी व  चिमुर विधानसभा मतदारसंघात सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-
2019 चे अनुषंगाने, 12 गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी, 66-आमगाव  या विधानसभा मतदारसंघात, दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यत मतदान घेण्यात येणार आहे. तसेच 73- ब्रम्हपूरी आणि 74- चिमुर या विधानसभा मतदारसंघात सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजता पर्यंत मतदान करता येईल.

11 एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2019 करिता दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी  मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.  सामान्य प्रशासन विभाग,महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द अधिसूचना दिनांक 27 मार्च 2019 अन्वये 12-गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघात गुरुवार दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात 37(1)(3) कलम जारी
जिल्ह्यात कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता असते. गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2019 चे अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागु असून या कालावधीत कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्याच्या दृष्टीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 29 मार्च 2019 ते दिनांक 12 एप्रिल 2019 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे  कलम 37 (1) (3) लागू करण्यात आलेले आहे. त्यामुळे या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतीना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. या कालावधीत शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी  इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमाकरणे, तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे किवा अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतेही जिनस किंवा वस्तु तयार करणे किंवा प्रसार करणार नाहीत. पोलीस विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त  इसम सार्वजनिक जागेत, सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवरदिनांक 29 मार्च 2019 ते 12 एप्रिल 2019 पर्यंत च्या 24 वाजेपर्यंत कोणीही जमा होणार नाहीत. हे कलम गडचिरोली जिल्ह्याच्या क्षेत्राकरिता लागू राहतील, असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी आदेशित केले आहे.

जिल्ह्यात मतदान केंद्राचे ठिकाणी 144 कलम लागू
भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या 18 मार्च ,2019 च्या अधिसूचना अन्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार, 12 गडचिरोली-चिमूर (अ.ज.) लोकसभा मतदार संघ, सार्वत्रिक निवडणूक -2019 करिता मतदान दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी घेणत येणार आहे.

जिल्हादंडाधिकारी
, गडचिरोली, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 भयमुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी 12 गडचिरोली-चिमूर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्व 935 अधिसूचित (Notified) मतदान केंद्राचे 100 मीटरच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. मतदान केंद्रात प्रवेश करतेवळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती (निवडणूक संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून) एकत्रिरित्या प्रवेश करणार नाहीत, मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात सार्वजनिक सभा घेता येणार नाही, मतदान केंद्राचे परिसरात मतदानाचे कालावधीत ध्वनी प्रक्षेपण (loudspeaker) करणार नाही. मतदान केंद्राचे परिसरात कोणत्याही प्रकाराच्या घोषणा देता येणार नाहीत. मतदान केंद्राचे परिसरात अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. मतदान केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस /वाहनास प्रवेशास मनाई राहील. मतदान केंद्राचे 100 मीटरच्या परिसरात कोणत्याही राजकीय पक्षास किंवा त्यांचे कार्यकर्त्यास प्रचार व प्रसार करता येणार नाही.

हे आदेश मतदान केंद्रावर काम करणारे अधिकारी/ कर्मचारी
, मतदान केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेबाबत त्यांचे कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत. आदेश दिनांक 9 एप्रिल 2019 चे दुपारी 3.00 वाजेपासून ते 11 एप्रिल 2019 चे रात्री 12.00 वाजेपर्यंत संबंधित मतदान केंद्राचे ठिकाणी अंमलात राहील. असे जिल्हादंडाधिकारी , गडचिरोली यांनी कळविले आहे. 

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा