महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, घरातून बाहेर पडू नका -पालकमंत्री बाळासाहेब पाटील मंगळवार, २४ मार्च, २०२०

सातारा : कोरोनाचा जगभर प्रादुर्भाव झाला आहे. आपल्या देशातही तो प्रादुर्भाव होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जे-जे प्रतिबंधात्मक उपाय सुरु केले आहेत ते 100 टक्के जिल्ह्यातील जनतेने पाळावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखणे हेच सध्या आपल्या सर्वांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. राज्यात कलम 144 लागू केले आहे. हे कलम आपल्या सर्वांच्या हितासाठी आहे. शासन आणि प्रशासन याबाबतीत कमालीचे सतर्क असून राज्यातील जनतेच्या हितासाठी योग्य पावले आम्ही उचलली आहेत. गरज आहे ते तुमच्या सहकार्याची… सहकार्य फक्त एवढेच करा… प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करा. घरातच राहा आणि दक्षता घ्या. त्यामुळे घरातून कोणीही बाहेर पडू नका, अशी विनंतीही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सर्वांना केली आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा