महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्ह्यात तालुकास्तरावर कोरोना नियंत्रण कक्ष कार्यान्वित गुरुवार, २६ मार्च, २०२०

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची नोडल ऑफीसर म्हणून नेमणूक

अमरावती :
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच तात्काळ प्रतिबंधात्मक उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात कोरोना नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. या नियंत्रण कक्षात तालुका आरोग्य अधिकारी यांची नोडल ऑफीसर म्हणून नेमणूक करण्यात आली असून केंद्राच्या आरोग्य पर्यवेक्षक व आरोग्य सेवक यांनी नियमित उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहे.

ग्रामीण भागात संशयित कोरोना रुग्ण आढळून आल्यास किंवा तसे लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींना तातडीने उपचार व्हावा, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात कोरोना नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विषाणूचा संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत. नागरिकांनी घाबरुन न जाता, कोवीड-१९ आजाराचे लक्षणे आढळल्यास तत्काळ तालुका आरोग्य अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. ग्रामीण भागातील नागरिकांच्या तपासणीसाठी व आवश्यक उपचार सुविधेसाठी नियंत्रण कक्षाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नाव, भ्रमणध्वनी व दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात येत आहे. संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहे-

अमरावती तालुक्याच्या नियंत्रण कक्षाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद करंजीकर (९०२१४४३०५०), आरोग्य पर्यवेक्षक दीपक खंडाते, आरोग्य सेवक दीपक नवाथे (८६००६९७२६८) नेमणूक करण्यात आली असून सदर केंद्राचा दूरध्वनी क्रमांक (०७२१-२६६१३०९) असा आहे. भातकुली तालुक्यातील केंद्रासाठी डॉ. प्रतिभा बोरखडे (९४२२००७९०६), आरोग्य पर्यवेक्षक श्री. चव्हाण (९८८११४६०४७८),आरोग्य सेवक अरविंद भेडे(९६६५३३५९८४) कार्यालयाचा दूरध्वनी क्र. (०७२१-२६६००५९) आदींची नेमणूक करण्यात आली आहे.

अंजनगाव सूर्जीसाठी डॉ. सुधीर डोंगरे (७७४४०२२१३५), श्रीमती आर. एस. खोडे (७८८७४२६३९७), टी. ओ. कोरडे (९३७२६९५२८४), दूरध्वनी क्र. (०७२२४-२४००९५), दर्यापूरसाठी डॉ. राजेंद्र राहाटे (९४२३४२४५८६), श्रीमती मंदा मोहोड (९०९६८१८६४८), विलास देशमुख (९४२१८२३८२०), दूरवध्नी (०७२२४-२३४०७०), वरुडसाठी डॉ. अमोल देशमुख (७७९८७६८२८२), खुशाल पिल्लारे (९४२१८२४०३८), नरेंद्र ददगाडे (८२७५२१७२४१) कार्यालय मो.क्र. (८६९८०९२९९०), मोर्शीकरीता डॉ. हेमंत महाजन (९८६०६७१६९१), व्ही. पी. पारोदे (९२८४८९७१९५), दिलीप निंभोरकर (९४२१८२६६५०), केंद्र दूरध्वनी क्र. ०७२२८-२२३०९३, धामणगाव रेल्वे तालुक्यासाठी डॉ. हर्षल क्षीरसागर (९३७२२५११२४), आय एच राठोड (९४२१८२८८७७), श्री. डकरे (९६०४२३९६६३), केंद्र दू. क्र. ०७२२२-२३८९९०, चांदूर रेल्वे तालुक्यासाठी डॉ. महेश जयस्वाल (९४२२२३१५२५), एस जी कुभंरे (९९२३०६१९६२), डि एम अडगोकर (९४२१८२४५८२), केंद दू. क्र. ०७२२२-२५५००३,

नांदगाव खंडेश्वर करीता डॉ. इंगळे (९६३७३८३९७०), शरद अंबाडकर (९५४५५२७५७०), आर डी पवार (९५२७००८३५७), केंद्र. दू. क्र. ०७२१-२२२००७, अचलपूरसाठी डॉ. किरण शिंदे (८६००३७४८०९), अरविंद पारधी (९४२२३५९०८०), विवेक पांडे (९८९०३९८२११), केंद्र दू. क्र. ०७२२३-२२७०२६, तिवसासाठी डॉ. ज्योत्सा पोटपीटे (९४२१८२०४६८), शरद घड्याची (८२७५८८६००५), राजेश विधाते (९८९००९९७२३), केंद्र दू. क्र. ०७२२५-२२२१२३, चांदूरबाजारसाठी डॉ. ज्योत्सा भगत (९४२१५२६८५५), व्ही. अवसरमोल (८८०५१६११७८), संजय चुडे (७७४५०७७१४५) दू.क्र.(०७२२७-२४३४४८), धारणीसाठी डॉ. शशिकांत पवार (९४२१७५३१४१), पी. व्ही. सपकाळ (८३२९८७७१०१), एम व्ही भगत (९८८१३६९७१४), का.(मो क्र. ९७६५२६६०९९), चिखलदरासाठी डॉ. सतिश प्रधान (९९६०३३४४७४), विजय गंगासागर (९४२३४२७६६३), एस सी गायगोले (९७६३४२८१९१), का. दू. क्र. ०७२२०-२३०५९३
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा