महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
रोजगार निर्मितीसाठी कोकण विभागात विशेष कार्यक्रम - महसूल आयुक्त शिवाजी दौंड शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

नवी मुंबई : कोकण विभागात मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम अधिक चांगल्याप्रकारे राबविण्यात यावा. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी केले आहे.

कोकण विभागातील शहरी आणि ग्रामीण भागातील सुशिक्षित युवक-युवतींना उपलब्ध असणाऱ्या रोजगार व स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात. यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम निश्चित करण्यात आला.

मुख्यमंत्री  रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना उद्योग विभागाच्या संनियंत्रणाखली उद्योग संचालनालय, मुंबई मार्फत राज्यात अंमलबजावणी  करण्यात येत असून जिल्हास्तरावर शहरी भागाकरीता जिल्हा उद्योग केंद्र व ग्रामिण भागाकरीता खादी व ग्रामोद्योग कार्यालये यांच्यामार्फत योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी  करण्यात  येत आहे.

ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात या कार्यक्रमांतर्गत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत 1 हजार 147 लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. तर खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत 789 लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. या पूर्वी शासनाने औद्योगिक धोरण, महिला धोरण, सामुहिक प्रोत्साहन योजना, कॉयर धरण, लॉजिस्टिक पार्क, तंत्रज्ञान पॉलिसी या सर्व धोरणांचा विचार करून मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रमाची निर्मिती व कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पोर्टलवरून लाभार्थ्यांनी अर्ज सादर करणे, जिल्हा कार्यबल समितीकडून बँकांना अर्ज शिफारस करणे, बँकानी अर्जावर कार्यवाही करणे, मार्जिनमनी देणे या सर्व बाबी ऑनलाईन पद्धतीने अर्जदाराला सहजपणे पाहता येणार आहे. उद्योग सहसंचालक कोकण विभाग यांनी याबाबत विशेष पुढाकार घेतला आहे.

कोकण विभागातील रोजगारासाठी इच्छुक असणाऱ्या युवक-युवतींनी www.maitri.mahaonline.gov.in/www.di.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 18602332028/022-22632322 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा