महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महसूल अधिकारी कर्मचारी यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार - राज्यमंत्री संजय बनसोडे सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेड जिल्हा विजेता तर लातूर द्वितीय व औरंगाबाद तृतीय

लातूर : महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या अडचणी जाणून घे त्या शासनपातळीवर सोडविण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.

जिल्हा क्रीडा संकूल मैदानावर आयोजित औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा समारोप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, औरंगाबाद महसूल विभागाचे उपायुक्त पराग सोमन उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, महसूल विभाग हा शासनाचा एक महत्वाचा विभाग आहे. महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी संघटनेच्या अडीअडचणी जाणून घेऊन शासनपातळीवर सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले. या विभागीय स्पर्धेत पुरस्कार प्राप्त संघ खेळाडू तसेच लातूर येथे विभागीय स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल लातूर महसून प्रशासनाचे अभिनंदन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यावेळी म्हणाले की, महसूल विभागाच्या सांघि स्पर्धेत कोतवालापासून ते उपायुक्त पर्यंत सर्वांना समान संधी देण्यात आली आहे. त्यामुळे वेगळाच आनंद होतो. प्रत्येक कर्मचारी अधिकारी यांनी वेगवेगळे परफॉम्स दाखविले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करावा, असे त्यांनी आवाहन केले.

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते स्पर्धेतील अंतिम गुणानुक्रमे विभागातील प्रथम, द्वितीय तृतीय आलेल्या संघास पुरस्कार दे सत्कार करण्यात आला. या बक्षीस वितरण कार्यक्रमास औरंगाबाद विभागातील उपजिल्हाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्याला विभागीय महसूल क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेचे सर्वसाधारण विजेते म्हणून घोषित करण्यात आले. तर लातूर जिल्हा द्वितीय औरंगाबाद जिल्ह्याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या स्पर्धेच्या वैयक्तीक क्रीडा प्रकारात नांदेड- 291 ,लातूर- 188 औरंगाबाद-147 असे अंतिम गुणांकन मिळून अनुक्रमे प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक मिळालेला आहे. तर जालना-40, बीड-134, उस्मानाबाद-71, परभणी-103 हिंगोली -38 असे  या जिल्ह्याला स्पर्धेचे विविध क्रीडा प्रकार सांस्कृतिक कार्यक्रमांतून गुणांकन मिळालेले आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा