महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
"शासनाचे मुखपत्र लोकराज्यचे सामूहिक वाचन"; एक लाख ४१ हजार २०६ वाचकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१९


उस्मानाबाद :
बालदिनाचे औचित्य साधून दि.14 नोव्हेंबर 2019 रोजी "एकाच दिवशी एकाच वेळी" शासनाचे मुखपत्र लोकराज्य या मासिकाचे सामूहिक वाचन हा उपक्रम उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आला होता. या उपक्रमाची  तालुकानिहाय अधिकृत आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

उस्मानाबाद तालुका उपस्थित शिक्षक संख्या 1 हजार 118, शिक्षकेतर कर्मचारी संख्या 338, उपस्थित मुले 13 हजार 682, उपस्थित मुली 11 हजार 819, उपस्थित पालक संख्या 1 हजार 440, तुळजापूर तालुक्यामध्ये उपस्थित शिक्षक संख्या 10 हजार 75, शिक्षकेतर कर्मचारी संख्या 432, उपस्थित मुले 11 हजार 933, उपस्थित मुली 11 हजार 73, उपस्थित पालक संख्या 1 हजार 714, कळंब तालुक्यात 1 हजार 98, शिक्षकेतर कर्मचारी संख्या 252, उपस्थित मुले 9 हजार 935, उपस्थित मुली 9 हजार 339, उपस्थित पालक 1 हजार 577, लोहारा तालुक्यामध्ये उपस्थित शिक्षक संख्या 422, शिक्षकेतर कर्मचारी संख्या 112, उपस्थित मुले 5 हजार 184, उपस्थित मुली 5 हजार 239 उपस्थित पालक 587, वाशी तालुक्यामध्ये उपस्थित शिक्षक संख्या 555, शिक्षकेतर कर्मचारी संख्या 176, उपस्थित मुले 5 हजार 458, उपस्थित पालक 811, परंडा तालुक्यामध्ये उपस्थित शिक्षक संख्या 533, शिक्षकेतर कर्मचारी संख्या 144, उपस्थित मुले 5 हजार 979, उपस्थित मुली 5 हजार 880, उपस्थित पालक 1 हजार 97, भूम तालुक्यामध्ये उपस्थित शिक्षक संख्या 612, शिक्षकेतर कर्मचारी संख्या 149, उपस्थित मुले 7 हजार 112, उपस्थित मुली 5 हजार 790, उपस्थित पालक 978, उमरगा तालुक्यामध्ये उपस्थित शिक्षक संख्या 11 हजार 6, शिक्षकेतर कर्मचारी संख्या 359, उपस्थित मुले 13 हजार 904, उपस्थित मुली 12 हजार 701, उपस्थित पालक 1 हजार 515.

तसेच जिल्हा परिषद शाळा 751, नगर परिषद शाळा 9, खाजगी शाळा 201, शासकीय अनुदानित 74 अशा विविध  शिक्षण संस्थांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता. अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण 1 लाख 41 हजार 206 वाचकांनी "लोकराज्य सामूहिक वाचन" या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमास यशस्वी केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा