महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
तक्रारींची तातडीने दखल घेण्याच्या पालकमंत्री पाटील यांच्या सूचना सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७
जनता दरबारात पालकमंत्री यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

अकोला :
सर्वसामान्य जनतेला येणाऱ्या अडचणींची तातडीने दखल घेऊन त्यांच्या समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात, अशी सूचना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विभागप्रमुखांनी दर सोमवारी होणाऱ्या जनता दरबारला स्वत: उपस्थित राहण्याबाबत त्यांनी यावेळी निर्देश दिले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी एस. रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, सहकार उपनिबंधक गोपाळ मावळे, अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, मनपाचे उपायुक्त समाधान सोळंके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

दि. 30 ऑक्टोबर व दि. 6 नोव्हेंबर रोजी झालेल्या पहिल्या व दुसऱ्या जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींचा पालकमंत्री यांनी प्रारंभी आढावा घेतला. या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली. याबाबतच्या अुनपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले.

आज झालेल्या जनता दरबारात एकूण 106 तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामाबाबतच्या लेखी स्वरूपातील तक्रारी नागरिकांनी पालकमंत्री यांना दिल्या. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाप्रमुखांकडे विचारणा करुन त्याचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचित केले. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी

विभागनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील पुढील प्रमाणे आहे, जिल्हा परिषद व पंचायत समितीबाबत 23 तक्रारी, पोलीस विभाग-05, महानगर पालिका/नगरपालिका-08, महसूल विभाग-41, आणि इतर विभागाच्या 29 तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या.

पालकमंत्री यांनी केली जुना आर.टी.ओ.कार्यालय ते तुकाराम चौक रस्त्यांची पाहणी
नागरिकांच्या प्राप्त निवेदनावर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी जुना आर.टी. ओ. कार्यालय ते तुकाराम चौक या रस्त्याची पाहणी केली. यावेळी रस्त्यांची दुरूस्ती तसेच रुंदीकरणासंबंधी पाहणी करून रस्ता रुंद करण्यासाठी अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण काढण्यासंबंधी त्यांनी संबंधीत विभागाला सूचना दिल्या. यावेळी नगरसेवक अशिष पवित्रकार, माजी नगरसेवक गोपी ठाकरे, पंकज जायले आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा