महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सायकल यात्रेला पालकमंत्र्यांनी दाखवला झेंडा शुक्रवार, ०९ नोव्हेंबर, २०१८
आरोग्यदायी जीवनासाठी आहाराच्या सवयी बदला मीठ, साखर,तेल कमी खा- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

ठाणे : महात्मा गांधी यांच्या
१५० व्या जयंतीनिमित्त केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या विद्यमाने जनतेत सुरक्षित, समतोल व पौष्टिक आहाराबाबत जनजागृती करण्यासाठी एक मोहीम स्वस्थ भारत यात्रा या नावाने १६ ऑक्टोबर पासून सुरु झाली असून आज सकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहिमेचा संदेश देणाऱ्या सायकल रॅलीला झेंडा दाखविला. तद्नंतर झालेल्या एका कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्वस्थ आणि आरोग्यदायी राहण्यासाठी अन्न पदार्थ खाण्याच्या सवयी बदलण्याची नितांत आवश्यकता आहे असे सांगितले.

याप्रसंगी रत्नागिरी येथील १६ वर्षीय गार्गी अहिरे हिने दाखविलेल्या योगाच्या प्रात्यक्षिकांनी सर्वांची मने जिंकली.

जिल्हाधिकारी नार्वेकर याप्रसंगी म्हणाले की, आपल्या पिढीला महात्मा गांधीच्या दांडी यात्रेत सहभागी होता नव्हते आले पण मीठ, साखर,तेल कमी खा असा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक यात्रेत आपण सर्वांनी सहभागी झालेच पाहिजे. ते म्हणाले की, शाळा, महाविद्यालये तसेच मॉल्स मधून देखील याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हॉटेल्स आणि उपाहारगृहात लावण्यासाठी १२ गोल्डन रुल्स या पत्रिकेचे विमोचनही करण्यात आले.

याप्रसंगी अन्न व औषधी प्रशासनाचे सह आयुक्त सुनील भारद्वाज यांनी या यात्रेचे महत्व सांगितले तर कोकण विभाग सहआयुक्त अन्न व औषधी प्रशासन शिवाजी देसाई यांनी या यात्रेने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात प्रवास
केला असून उद्या ती मुंबईत व नंतर पालघर आणि मग पुढे इतर राज्यांतून दिल्लीला पोहचेल असे सांगितले.या यात्रेने ६८५ किमी अंतर पूर्ण केले असून त्यात ४०५ सायकल स्वार आहेत, १४ ठिकाणी प्रभात फेऱ्या झाल्या असून १५ हजारापेक्षा जास्त लोक यात सहभागी झाल्याचे सांगितले.
 
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा