महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
स्व.बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक वैशिष्टयपूर्णरित्या उभारण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश शुक्रवार, १० जानेवारी, २०२०
औरंगाबाद येथील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित जागेची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

औरंगाबाद : निसर्गाला पूरक असे वैविध्य व वैशिष्टयपूर्ण स्वरूपाचे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात यावेअसे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्मारक पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित जागेची पाहणी आज श्री.ठाकरे यांनी केली. यावेळी उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाईरोहयो मंत्री संदिपान भूमरेमहापौर नंदकुमार घोडेलेमुख्य सचिव अजोय मेहताआमदार अंबादास दानवेजिल्हाधिकारी उदय चौधरीमनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेयपोलीस आयुक्त चिरंजीव प्रसादमाजी खासदार चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती.

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारक परिसरात असलेल्या निलगिरीशिवबाभूळ आदी वृक्षांमध्ये वाढ करून इतर वन्यजीवांना आवश्यक असलेल्या वृक्षांची लागवड या ठिकाणी करावी. यामध्ये विविध पक्षांचा अधिवास वाढेल याचा विचार व्हावा. तसेच पर्यावरणपूरक रचनेवर आधारीत स्मारकाची उभारणी करण्यावर भर द्यावाअसेही श्री. ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी सांगितले.

श्री. ठाकरे यांना मनपा आयुक्त श्री.पांडेयवास्तूविशारद धीरज देशमुखश्री.दवे यांनी स्मारकाच्या नियोजित आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा