महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
प्रत्येक मतदान केंद्रावर चुनाव पाठशाला; संभाव्य मतदारांनाही मिळेल माहिती गुरुवार, १४ मार्च, २०१९

अमरावती : निवडणूक प्रक्रियेबाबत नव्या व संभाव्य मतदारांच्या, तसेच नागरिकांच्या जाणिवा समृद्ध करणे व नैतिक कर्तव्याचे भान जागविण्याच्या हेतूने प्रत्येक मतदान केंद्रावर चुनाव पाठशाळा तयार करण्यात यावी, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

लोकसंख्या निर्धारित करुन मतदार नोंदणी, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित प्रात्यक्षिकासह नागरिकांना शिक्षित करणे, ईव्हीएम- व्हीव्हीपॅटची ओळख, त्याची वैधता व जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नागरिकांना त्यांच्या मताची किंमत, निर्भयपणे मतदान करण्याची नैतिक जबाबदारी याबाबत जनजागृती. समाजात निवडणूक साक्षरता वाढविण्यासाठी निवडणूक साक्षरता क्लबच्या सदस्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रियेबाबत साक्षरता वाढविण्यात यावी व मतदार नोंदणीसाठी पात्र असलेल्या नागरिकांना मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.

एव्हरी व्होट काऊंटस् आणि नो व्होटर टू बी लेफ्ट बिहाइंड या आयोगाच्या घोषणेनुसार नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेत सहभाग, मतदान करण्याचे नैतिक कर्तव्य याबाबत समाजात वातवरण तयार करण्यात यावे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या समन्वयाने चुनाव पाठशाला स्थापन करुन मतदान केंद्राचे नाव त्या चुनाव पाठशाळेला देण्यात यावे. सदस्य व भागीदार- चुनाव पाठशाळा ही सर्व जनतेसाठी खुली ठेवण्यात यावी व त्यामध्ये पुढे नमूद केलेल्या वयोगटातील नागरिकांचा सहभाग असावा.

वय 14 ते 17 वयोगटातील आणि शाळा सुटलेले संभाव्य मतदार, वय वर्षे 18-19 वयोगटातील नवीन मतदार, स्त्रिया (तरुण व मध्यम वयोगटातील) तसेच वरिष्ठ नागरिक यांचा या उपक्रमात समावेश करण्यात यावा, असेही निर्देश त्यांनी दिले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा