महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
दुष्काळ निवारणार्थ प्रभावीरित्या उपाययोजना राबवाव्यात- पालक सचिव दिनेश वाघमारे सोमवार, ०३ जून, २०१९


जालना :
 
जालना जिल्ह्यात गेल्या दोन तीन वर्षांपासून कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन दुष्काळाची निवारणार्थ प्रभावीरित्या उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देशसामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव तथा जालना जिल्ह्याचे पालक सचिव  दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारण उपयोजनाबाबतच्या आढावा बैठकी श्री. वाघमारे बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी , आरोग्य, सिंचन, जिल्हा परिषद, निबंधक कार्यालय इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


यावेळी
 श्री. वाघमारे यांनी राज्यातील विविध भागात दोन तीन वर्षापासून कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ, पाणी टंचाईच्या समस्येचा यशस्वीरित्या सामना करण्याकरीता शासन विविध स्तरांवर सक्रिय प्रयत्न करत आहे. दुष्काळाच्या निवारणार्थ वेगवेगळ्या विभागांमार्फत प्रभावीरित्या उपयुक्त योजनांची अंमलबजावणी करुन या परिस्थितीतुन बाहेर पडणे शक्य आहे. जालना जिल्ह्यात जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषद इतर यंत्रणांच्या सोबतीने   चांगले काम करत असल्याचे नमुद करुन श्री. वाघमारे यांनी  दुष्काळ निवारणाच्या कामांचा वेग व्यापकता वाढविणे येत्या काळात गरजेचे आहे. त्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी भरीव स्वरुपात योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत विविध निर्देश श्री. वाघमारे यांनी यावेळी दिले.

दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांना तत्परतेने पाणी, आरोग्य सुविधा, रोजगार, जनावरांना चारा इतर पुरक उपाययोजना उपलब्ध करुन द्याव्यातपीक कर्ज वाटपामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काम चांगल्या पध्दतीने सुरु असून त्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण बँक यांनी पिक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढवावे. पाणीपुरवठा योजनेची चर खोदणे इतर कामे ज्या भागात सुरु आहे त्या ठिकाणी विनाखंडीत वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यास कटाक्षाने लक्ष द्यावे. मग्रारोहयो अंतर्गत मजुरांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन द्यावा तसेच मजुरांचे वेतन वेळेत अदा करावे. गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण करावीत. जिल्ह्यातील पर्जन्यमान वाढविण्याच्या दृष्टीने वृक्ष संवर्धनाला प्राधान्य द्यावे. सामाजिक वनीकरण विभागाने  मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. इतर सर्व यंत्रणांनी वृक्ष संवर्धनासाठी भरीव काम करणे गरजेचे आहे. बदलत्या हवामानाचे आव्हान लक्षात घेऊन प्रभावी पूर्व तयारी, उपाययोजना कराव्यात. शेतकरी सन्मान योजनेत विहित मुदतीत अनुदान वितरीत करावेत. जनसामान्यांच्या कल्याणाकरीता सर्व यंत्रणांनी विविध शासकीय योजना उत्कृष्टपणे समन्वयपुर्वक प्रभावीरित्या राबवाव्यात, असे आवाहन श्री. वाघमारे यांनी यावेळी केले

जालना जिल्ह्यात ग्रामीण नागरी भागात पाणीटंचाई निवारणार्थ 528 गावे 122 वाड्यामध्ये 670 टँकर चालु असून 785 गावांमध्ये 697 टँकरसाठी टॅकर व्यतिरिक्त विहिर अधिग्रहण केलेल्या आहेत. जिल्ह्यात शहरी/ग्रामीण भागात टँकरच्या 1627 फे-या मंजुर असुन 1138 फे-या आतापर्यंत झाल्या आहेत. 670 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आलेल्या गावांची लोकसंख्या 1189233 इतकी आहे. नळ पाणी पुरवठा विशेष दुरुस्ती अंतर्गत विहिर खोलीकरण, आडवे/उभे बोर घेणे, पाईलाईन दुरुस्ती पंपदुरुस्ती/बदलणे . 194 कामे पुर्ण आहेत नळयोजना विशेष दुरुस्ती तात्पुरती पुरक योजनेची कामे झाल्यामुळे 76 गावे/वाड्यांमध्ये टँकरद्वारे अद्यापपर्यंत टँकर लागलेले नाही. जिल्ह्यामध्ये चर घेण्यासाठी एकुण 16 प्रस्ताव मंजुर करण्यात आले असून त्यामधुन पाणीपुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रकल्पातील पाणसाठी लक्षात घेता निम्न दुधना प्रकल्पाची क्षमता 344.80 ...मी. इतकी आहे. जिवंत साठा शिल्लक नसुन मृतसाठ्यात 75.30 ...मी. पाणीसाठा आहेजिल्ह्यामध्ये पशुधनामध्ये  मोठी जनावरे 395127 ,लहान जनावरे 302271  एकुण 697398 पशुधन आहे. त्यांना लागणा-या  चा-याची दैनंदिन गरज 2755225 किलो एवढी आहे

सन 2018 च्या दुष्काळी कालावधीत जिल्ह्यामध्ये मंजुर चारा छावण्याची संख्या 48 एवढी असून 32 चारा छावण्या  सुरु झालेल्या आहेतत्यामध्ये 18761 मोठे जनावरे, 3241 लहान जनावरे आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये पहिल्या हप्त्यामध्ये एकुण 101547 , दुस-या हप्त्यामध्ये 48192 अशा एकुण 149739 इतक्या शेतक-यांना 2994780000 इतका  निधी वितरीत करण्यात आलेला आहे खरीप 2018 दुष्काळ निधीसाठी एकुण 478 कोटी 3 लक्ष निधी मंजुर असुन 330 कोटी 38 लक्ष निधी प्राप्त झाला असुन तो वाटप करण्यात आला आहे सध्या 147 कोटी 64 लक्ष निधीची आवश्यकता आहे. मग्रारोहयो अंतर्गत शेल्फवरील कामांची 27811 इतकी संख्या असून 847 कामे सुरु आहेत तर उपस्थित मजुर संख्या 27586 आहे. जालना जिल्हा राज्यामध्ये मजुर उपस्थितीत सहाव्या क्रमांकावर तर औरंगाबाद विभागात दुस-या क्रमांवर आहे,अशी माहिती  श्री. वायाळ यांनी यावेळी दिली

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा