महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या विचारांचा आदर्श घेण्याची गरज - महसूल राज्यमंत्री संजय राठोड शनिवार, १४ एप्रिल, २०१८
यवतमाळ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व हा मौलिक विचार दिला. या विचारांचा आदर्श घेण्याची आज समाजाला नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सहपालकमंत्री संजय राठोड यांनी केले. स्थानिक बसस्टॅन्ड चौकातील डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करतांना ते बोलत होते.

डॉ.आंबेडकरांचे विचार, त्यांचे आदर्श आचरणात आणणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे संविधानातील अधिकार समाजातील सर्व घटकांसाठी विचारपीठ होय. यातूनच भावी पिढीमध्ये समतेचे बीज पेरायचे आहे. आजही वैचारीक प्रबोधनाचा वारसा जपला जातो. समाज प्रबोधनाचा हा जागर नवी दिशा देणारा आहे, असे ते म्हणाले. तत्पूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा