महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची खर्चाची तपासणी मंगळवारी सोमवार, १५ एप्रिल, २०१९

धुळे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता 02- धुळे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी 16 एप्रिल 2019 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील खर्च तपासणी कक्षात उपस्थित राहून खर्चाची तपासणी करुन घ्यावी, असे खर्च तपासणी विभागाचे नोडल अधिकारी बाबूलाल पाटील यांनी कळविले आहे.

 

नोडल अधिकारी श्री.पाटील यांनी म्हटले आहे, उमेदवारांकडून निवडणुकीदरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल केल्याच्या तारखेपासून ते निकालाच्या दिवसापर्यंत प्रचार व प्रसिद्धीच्या दैनंदिन खर्चाचा हिशेब विहीत नमुन्यात ठेऊन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे.

 

02- धुळे लोकसभा मतदारसंघाचे खर्च तपासणी निरीक्षक पी. विजयकुमार यांच्याकडून प्रचार कालावधीत एकूण तीनदा तपासणी होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पहिली तपासणी 16 एप्रिल रोजी सकाळी ठीक 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होईल.

 

सर्व उमेदवारांनी आपले अधिकृत प्रतिनिधी दैनिक खर्च नोंदवही अद्ययावत करून, सर्व प्रमाणकांच्या स्वाक्षरीसह छायांकित प्रती, बँक खात्याचे अद्ययावत स्टेटमेंट यासह उपस्थित राहावे. तसेच दुसरी तपासणी 23 एप्रिल रोजी, तर तिसरी व अंतिम तपासणी 28 एप्रिल 2019 रोजी होईल. याची 02- धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही नोडल अधिकारी श्री.पाटील यांनी म्हटले आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा