महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकराज्यचा ‘शैक्षणिक विशेषांक’ वाचनीय व माहितीपूर्ण - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१८
पुणे : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या लोकराज्य मासिकाचा सप्टेंबर महिन्याचा ‘सामर्थ्य शिक्षणाचे, समृद्ध महाराष्ट्राचे’ हा विशेषांक सर्व स्तरातील विद्यार्थी व नागरिकांसाठी वाचनीय व माहितीपूर्ण आहे, असे मत पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केले.

आज लोकराज्यच्या सामर्थ्य शिक्षणाचे, समृद्ध महाराष्ट्राचे या सप्टेंबर महिन्याच्या विशेषांकाचे प्रकाशन डॉ. म्हैसेकर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पुणे विभागीय माहिती उपसंचालक मोहन राठोड, उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्रकार, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, सहायक संचालक वृषाली पाटील आदी उपस्थित होते.

लोकराज्य मासिकाच्या सप्टेंबर महिन्याच्या अंकामध्ये विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या तरूणांच्या यशकथा, विविध क्षेत्रातील नव्या संधी, उद्योगनिर्मिती, कौशल्य विकास या विषयावरील विशेष लेखांचा समावेश आहे. कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, यांच्यासह डॉ. गो. मा.पवार, डॉ. भालबा विभूते, विभागीय संपर्क अधिकारी डॉ. संभाजी बापट तसेच विविध जिल्ह्यांतील जिल्हा माहिती अधिकारी यांनी आपल्या लेखणीचे योगदान लोकराज्य विशेषांकासाठी दिले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा