महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक बिनविरोध सोमवार, १४ मे, २०१८
सांगली : 285-पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रांच्या छाननीमध्ये 9 उमेदवारांची नामनिर्देशन पत्र वैध ठरली होती. आज नामनिर्देशन पत्र माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी 8 उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्र माघार घेतली. या पोट निवडणुकीसाठी विश्वजीत पतंगराव कदम, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, या एकाच उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिल्याने 285-पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे श्री. विश्वजीत पतंगराव कदम, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (मु.पो. सोनसळ, ता. कडेगाव) यांची डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागी निवड झाली आहे, अशी माहिती 285-पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा