महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लातूर येथे अटल महाआरोग्य शिबीरात 1 लाख 3 हजार रूग्णांची तपासणी रविवार, ०७ ऑक्टोंबर, २०१८
शस्त्रक्रिया व पुढील उपराचासाठी 27 हजार 600 रूग्णांची नोंदणी
पालकमंत्री निलंगेकर यांच्याकडून रक्तदान
शिबीरात सुमारे दीड लाख लोकांची उपस्थिती

लातूर :
जिल्ह्यातील गोर-गरीब, गरजू व आर्थिक परिस्थिती नसलेल्या रूग्णांसाठी आरोग्य सुविधा विनामूल्य उपलब्ध व्हाव्यात व एकही गरजू रूग्ण उपचारापासून वंचित राहू नये म्हणून अटल महाआरोग्य शिबीराचे येथील हरंगुळ रेल्वे स्टेशनच्या अटल मैदानावर आयोजन करण्यात आले. आजच्या या शिबीराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

या शिबीराच्या 6 नोंदणी कक्षात जिल्हाभरातून आलेल्या 1 लाख 3 हजार रूग्णांची नोंदणी होऊन त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. यामध्ये शस्त्रक्रिया व पुढील उपचारासाठी 27 हजार 600 रूग्णांची नोंदणी करण्यात आली. तर सर्वाधिक रूग्णांची तपासणी ही नेत्र विभागात करण्यात आली. ही संख्या 17 हजार 500 इतकी असून यापैकी 6 हजार 300 रूग्णांना चष्म्यांचे वाटप करणत आलेले आहे. त्याप्रमाणेच दंतरोग चिकित्सा विभागात 7 हजार 800 रूग्णांची तपासणी होऊन त्यातील 340 रूग्णांना दाताच्या कवळ्या देण्यात आल्या. तर उर्वरित रूग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार देऊन सोडण्यात आले. या शिबीरात अवयवदानासाठी 851 लोकानी आपला अर्ज भरून देऊन अवयावदान करण्याचा संकल्प केलेला आहे.

पालकमंत्र्यांचे रक्तदान
रक्तदान विभागात जाऊन 375 नागरिकांनी रक्तदान कलेले असून लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनीही रक्तदान केलेले आहे. या शिबीरात 1 लाख 3 हजार रूग्णांची तपासणी होऊन त्यांच्यावर व्याधीप्रमाणे उपचार करण्यात आले.

या शिबीरात एकूण 24 उपचार विभाग निर्माण करून त्यातअंर्गत 94 तपासणी कक्ष रूग्णांच्या सोईसाठी निर्माण केलेली होते.रूग्णवाहीकेसाठी 4 विभाग,आप्तकालीन व्यवस्थेसाठी 4 विभाग, विविध शस्त्रक्रियेसाठी 4 विभाग, चौकशी कक्ष-4, रक्तदान-1, लाईव्ह योग कक्ष-1, रक्त तपासणी -1, रूग्ण नोंदणी कक्ष-6, भोजन -4, औषधी वितरण-2 या पध्दतीने विभाग व कक्षांची निर्मिती रूग्ण सेवेसाठी करण्यात आली होती.

या ठिकाणी 50 रूग्णवाहिका, स्ट्रेजचर, व्हीलचेअर, पाणीपुरवठा व्यवस्था, रूग्णांची बिस्कीट व्यवस्था, भोजन व्यवस्था नियोजनबध्द केली होती. तसेच रूग्णांच्या तपसणीसाठी 2 हजार डॉक्टर रूग्णांना मार्गदर्शन व शिबीरात काम करण्यासाठी मोठया प्रमाणवर स्यंसेवक उपस्थित होते. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. त्याप्रमाणेच अशा वर्कर्स, नर्सिंग स्टाफ, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनी, स्वयंसेविका संघटनेचे प्रतिनिधी आदिंनी या शिबीराच्या यशस्वी आयोजनात महत्वाची भूमिका बजावली आहे.

हे शिबीर आज संपले असले तरी शस्त्रक्रिया व पुढील उपचारासाठी 27 हजार 600 रुग्णांची नोंदणी झाली असून या सर्व रूग्णांवर पुढील 2 महिन्यात व्याधीप्रमाणे शस्त्रक्रिया व उपचार करून त्यांचा आजार पूणपणे बरा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत. या रूग्णांवर पुढील उपचार कशा पध्दतीने व कोणत्या रूग्णांलयात केले जाणार आहेत याचे पूर्ण नियोजन करण्यात आले असून त्यानुसार त्या-त्या रूग्णांना बोलविण्यात येऊन त्यांच्यावर ने-आण खर्चासह विनामूल्य उपचार केले जातील त्यांना त्यांचे पुढील जीवन आरोग्यदायी जगता येईल हा विश्वास रूग्णांना शिबिरातून देण्यात आला.

या शिबीरासाठी दानशूर व्यक्ती, संघटना, खाजगी कंपन्यांनी साहित्य, औषधी पुरवठा व शस्त्रक्रियाचा खर्च उचलला असून त्यामुळे लातूर जिल्ह्यातील 1 लाख 3 हजार रुग्णांची विनामूल्य तपासणी करण्यात आली. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, अरविंद पाटील निलंगेकर, निरामय फाऊंडेशन, विविध खाजगी कंपन्या,नामवंत डॉ.संघटना,आरोग्य विभाग,जिल्हा प्रशासन,महाविद्यालयीन विद्यार्थी,स्वयंसेवक आदिंनी परिश्रम घेऊन मानव सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे कृतीतून दाखवून दिले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा