महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राजधानीत शहीदांना अभिवादन सोमवार, २३ मार्च, २०२०


नवी दिल्ली : 
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान देणारे शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना आज शहीद दिनानिमित्त राजधानीत अभिवादन करण्यात आले.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा