महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मतमोजणी केंद्राला निवडणूक अधिकाऱ्यांसमवेत पत्रकारांची भेट मंगळवार, १४ मे, २०१९

नाशिक : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया 29 एपिल 2019 रोजी पूर्ण झाली आहे. 20 दिंडोरी व 21 नाशिक या मतदारसंघाची मतमोजणी 23 मे 2019 रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने अंबड वेअर हाऊस येथे होणाऱ्या मतमोजणी केंद्राला उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांचे समवेत जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक व मुद्रीत माध्यमांतील पत्रकारांनी भेट दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, निवडणुक तहसिलदार प्रशांत पाटील उपस्थित होते.  

यावेळी श्री.आनंदकर यांनी कंट्रोलरुममध्ये ठेवण्यात येणाऱ्या सिसिटीव्हीची माहिती तसेच नाशिक व दिंडोरी मतमोजणीच्या केंद्रात हवा, प्रकाश व वीज व्यवस्था त्याचप्रमाणे सुरक्षेच्याबाबत करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची माहिती पत्रकारांना दिली. मतमोजणीच्या दिवशी मीडिया कक्षासाठी निश्चित केलेल्या जागेची देखील पाहणी करुन माध्यमांना लागणाऱ्या सोयी सुविधेबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.  

मतमोजणीच्या दिवशी पत्रकारांनी मतमोजणी केंद्रात दि. 23 मे रोजी स. 7.15 वा. पोहोचणे आवश्यक असून निवडणूक आयोगाचे पास सोबत ठेवणे आवश्यक असल्याचे श्री.आनंदकरांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. 

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा