महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते लोकराज्य स्टॉलचे उद्घाटन शुक्रवार, ११ जानेवारी, २०१९

यवतमाळ येथे 92 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलनयवतमाळ
 :
 यवतमाळ येथे आजपासून 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात झाली. यावेळी ग्रंथप्रदर्शनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लोकराज्य अंकांचा स्टॉल लावण्यात आला. या स्टॉलचे उद्घाटन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुखपोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक (माहिती) सुरेश वांदिलेअमरावती विभागाचे उपसंचालक राधाकुष्ण मुळीजिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसेजिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकरसहायक संचालक गजानन कोटुरवारमंगेश वरकड आदी उपस्थित होते.

 

साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीध्वजारोहणग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर हा कार्यक्रम झाला. लोकराज्य स्टॉलवर लोकराज्यचे विविध विशेषांक यांच्यासह महामानवमहात्मा गांधी आणि महाराष्ट्रमहाराष्ट्र वार्षिकीमॅग्नेफिशियंट महाराष्ट्र आदीचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह इतर मान्यवरांनी लोकराज्यच्या अंकांची तसेच इतर प्रकाशनांची पाहणी केली.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा