महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
'संवाद वारी' वारकऱ्यांशी थेट संवाद साधणारे माध्यम – तहसीलदार बालाजी सोमवंशी मंगळवार, १० जुलै, २०१८
पुणे : 'संवाद वारी' या उपक्रमातून पथनाट्य व कलापथकाचे प्रयोग सादर होत आहेत. यवत येथे आज हे प्रयोग सादर करण्यात आले. राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना अभिनव पद्धतीने वारकऱ्यांपर्यंत याद्वारे पोहोचवल्या जात आहेत, असे दौंडचे तहसिलदार बालाजी सोमवंशी यांनी सांगितले. वारकरी हे बहुसंख्येने शेतकरी असल्याने त्यांच्यासाठीच्या शासनाच्या योजना कलापथक तसेच पथनाट्याद्वारे थेट सादरीकरणातून पोहोचत आहेत. याचा त्यांना फायदा होईल, असेही ते म्हणाले.

'संवाद वारी' मुळे प्रत्येकाच्या घरात राज्य शासनाच्या योजना जातील - गटविकास अधिकारी गणेश मोरे

संवाद वारी या उपक्रमातील पथनाट्य हा स्तुत्य उपक्रम आहे. शासनाच्या योजनांची अचूक माहिती याद्वारे प्रत्येकापर्यंत पोहोचत आहे. याबरोबरच प्रबोधनदेखील होते आहे, असे प्रतिपादन दौंडचे गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी केले. शासन प्रत्येकाच्या सुखी आयुष्यासाठी प्रयत्न करत असून त्या योजनांचा लाभ सामान्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा