महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पेप्सीकोच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट बुधवार, ११ जुलै, २०१८
नागपूर : पेप्सिकोच्या भारतीय उपखंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष अहमद एल शेख यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भारतातील व महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढविण्यासंदर्भात तसेच इतर विविध विषयांवर चर्चा केली.


श्री.शेख यांनी पेप्सीको कंपनीच्या सध्याच्या प्रकल्पाची माहिती देऊन देशात तसेच महाराष्ट्रात व्यवसाय वाढविण्याच्या संदर्भात माहिती दिली. तसेच महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक वाढविण्यासंदर्भात चर्चा केली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा