महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट गुरुवार, १४ मार्च, २०१९


नवी दिल्ली :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माजी महासंचालक व विद्यमान राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.

कार्यालयाचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी श्रीमती अमरज्योत कौर अरोरा, लेखा अधिकारी निलेश केदारे व सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी परिचय केंद्राच्या कार्याची वैविध्यपूर्ण माहिती श्री. कांबळे यांनी दिली. तसेच श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी महासंचालक पदावर असताना परिचय केंद्रात दहा वर्षापूर्वी भेट दिल्याचे सांगितले.

दिल्ली कार्यालयामार्फत होत असलेल्या कामांचे कौतूक करताना सुसज्ज ग्रंथालय, स्वच्छ कार्यालय, आयएसओ-9001 प्रमाणित व आधुनिक प्रसार माध्यमांचा वापर या सर्व बाबींमुळे दिल्लीचे माहिती व जनसंपर्क कार्यालय हे नावलौकिक कमवत आहे. महाराष्ट्र राज्याच्या सर्व उपाययोजनांची माहिती हे कार्यालय देत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच वाटचालीसाठी शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा- http://twitter.com/MahaGovtMic
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा